इमरान हाश्मीने शमीर टंडन यांच्या मधुर ट्रॅकचे केले कौतुक.
आगामी हॉरर थ्रिलर 'द बॉडी' हा इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील गाण्यांना शमीर टंडन यांनी संगीतबद्ध केलेले आहे. आजवर इमरानवर चित्रित केलेल्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले आहे. 'द बॉडी' मधील गाण्यांबद्दल सांगताना इमरान म्हणतो की, "मला हृदयाला स्पर्शणारे संगीत आवडते. मी नशीबवान आहे की माझी बहुतांश सर्वच गाणी ही हृदयस्पर्शी आहेत. सनी खन्ना यांनी जेव्हा शमीरने रचलेला हा ट्रॅक मला ऐकवला तेव्हा त्यातील बारकावे मला फार आवडले. तेव्हा त्वरित जाणवले की हा एक शांत पण अतिशय भावनिक ट्रॅक आहे. एवढेच नाही तर शमीरची प्रत्येक गाणी प्रशंसनीय आहेत."
'द बॉडी' या व्हायकॉम १८ च्या आगामी चित्रपटात इमरान हाश्मी, रिशी कपूर व सोभिता धूलिपलिया प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत आढळून येणार असून सुनील खेत्रपाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. टी-सिरीज ने या चित्रपटाची गाणी रिलीज केलेली आहेत.
Comments
Post a Comment