देवांश एस बड़जात्या आणि नंदिनी भट्टड यांच्या लग्नाचे रिसेप्शन…
नुकतेच २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रख्यात चित्रपट निर्माते सूरज आर. बडजात्या यांचे थोरले चिरंजीव देवांश एस. बडजात्या व नंदिनी भट्टड विवाह बंधनात बांधले गेले. या पवित्र विवाहसोहळ्याप्रसंगी संपूर्ण बडजात्या कुटुंब व जवळचे मित्र परिवार उपस्थित होते.
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी, राजश्री प्रॉडक्शन्स (पी) लिमिटेडच्या बडजात्या कुटुंबाने देवांश आणि नंदिनीच्या भव्य रिसेप्शनमध्ये फिल्म इंडस्ट्री व व्यापारातील मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.
देवांश राजश्री प्रॉडक्शन (पी) लि. च्या प्रतिष्ठित टेलिव्हिजन आणि फिक्शन डिजिटल विभागाचे प्रमुख आहेत. राजश्री प्रॉडक्शन्स (पी) लिमिटेडची स्थापना १९४७ मध्ये झाली. यांनी उपहार, नदिया के पार, मैने प्यार किया, हम आपके है कौन, विवाह आणि प्रेम रतन धन पायो यांसारखे संस्मरणीय चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीला दिले आहेत.
Comments
Post a Comment