कलाकारांनी केले पद्मश्री महेंद्र कपूर चौकाचे अनावरण!
पपद्मश्री सन्मानित प्रसिद्ध पार्श्वगायक महेंद्र कपूर यांच्या समरणार्थ नुकतेच बांद्रा पश्चिम येथील टर्नर रोड आणि सेंट मार्टिन्स रोड च्या जंक्शनला एक चौक बांधला गेला होता, सिनेअभिनेता जितेन्द्र, सुरेश वाडकर, जॉनी लीवर, उदित नारायण, दीपा नारायण आणि मधुश्री यांसारख्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांनी एकत्र येऊन रूहान महेंद्र कपूर, नीरजा रूहान कपूर आणि सिद्धांत कपूर या पद्मश्री महेंद्र कपूर यांच्या कुटुंबासमवेत या चौकाचे अनावरण केले. महेंद्र कपूर यांचे कुटुंब, शुभचिंतक आणि इतर अनेक प्रतिष्ठित मंडळींनी उपस्थिती दर्शवून हा कार्यक्रम आनंददायक आणि महत्त्वाचा बनविला.
स्वर्गीय महेंद्र कपूर हिंदी गाण्यांच्या सुवर्णयुगवर वर्चस्व गाजवणाऱ्या काही निवडक गायकांपैकी एक होते. ज्याप्रमाणे मुकेश हा राज कपूरचा यांचा आत्मा होते, त्याचप्रमाणे महेंद्र कपूर मनोज 'भारत' कुमारचा आवाज होते. त्यांनी उपकार चित्रपटातील 'मेरे देश की धरती', रोटी कपडा और मकान चित्रपटातील 'और नही बस और नही' यांसारखी देशभक्तीपर गीते तसेच अनेक अभिनेत्यांसाठी हिट गाणी गायली आहेत.
महेंद्र कपूर यांचा मुलगा रुहान महेंद्र कपूर आणि नातू सिध्दार्थ कपूर, आपल्या वडिलांचा आणि आजोबांचा संगीत वारसा पुढे नेत संगीत आणि सांगीतिक समुदायाचे जग प्रभावित करीत आहेत.
Comments
Post a Comment