पीएमकेअर्स फंडसाठी ईस्रा आयोजित व्हर्च्युअल कॉन्सर्ट 'संगीत सेतू' ला मिळाला गानकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, सुदेश भोसले, सोनू निगम आणि अन्य गायक-संगीतकारांचा पाठिंबा







आज रात्री वाजल्यापासून कोविड-१९ विरोधात पीएमकेअर्स फंडसाठी ईस्रा आयोजित व्हर्च्युअल कॉन्सर्ट 'संगीत सेतू'  मध्ये १८ नामवंत गायक करतील लाईव्ह परफॉर्म

संगीत सेतू, १८ भारतीय कलाकारांची व्हर्च्युअल मैफिलीची मालिका, या २१ दिवसांच्या लॉकडाऊन अंतर्गत भारतीय नागरिक आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा ईस्राचा अनोखा प्रयत्न आहे. १० ते १२ एप्रिल दरम्यान सायंकाळी ते १०वा. सर्व मुख्य पोर्टलवर प्रसारित होणारा 'संगीत सेतू' कोविड-१९ च्या विरोधात पीएमकेअर्स फंडाला पाठिंबा देण्यासाठी इंडियन सिंगर्स राईट असोसिएशन (ईस्राचा) च्या वतीने आयोजित संकल्पित करण्यात आला आहे. या  १८ दिग्गज गायक-संगीतकार मध्ये भारतीय संगीत उद्योगातील दिग्गज आशा भोसले, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रमण्यन, उदित नारायण, कुमार सानू, हरिहरन, के.जे. येसुदास, सोनू निगम, कैलाश खेर, सलीम मर्चंट, शंकर महादेवन, अनुप जलोटा, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, पंकज उदास, शान आणि तलत अजीज या नावांचा समावेश आहे.

 या उपक्रमाच्या सुरुवातीलाच भारतरत्न लता मंगेशकर यांचा आशीर्वाद लाभला. पीएमकेअर्स संगीत सेतू ऑनलाइन मैफिलीला पाठिंबा देण्यासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी ट्विटरवरुन त्यांच्या चाहत्यांना ह्याबद्दल माहिती दिली. त्यांनी  लिहिले, “आमच्या गायकांच्या संघटना ईस्राचा (@ISRACopyright) माध्यमातून आम्ही 'संगीत सेतू' संगीत कार्यक्रम सादर करीत आहोत. त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मला आशा आहे की, आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्याल." संगीत सेतू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलने (@ISRACopyright.) गानकोकिळा यांचे ट्विट पुन्हा रीट्विट करत त्यावर लिहले, "कार्यक्रमाच्या प्रारंभास आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभल्या, यांसाठी आम्ही भारतीय संगीताच्या लेजेंड लता मंगेशकर (@mangeshkarlata) यांचे आभार मानतो."

संगीत सेतु व्हर्च्युअल मैफलीचा अजून एक भाग असलेले ज्येष्ठ पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी सांगितले की, “जीवघेणा कोरोनाव्हायरसविरूद्ध पीएमकेअर्स फंड ला पाठिंबा देणाऱ्या 'संगीत सेतू' ईस्राच्या व्हर्च्युअल कॉन्सर्टचा भाग होण्याचा खरोखर आनंद आहे. आशा आहे की लोक आमच्या माननीय पंतप्रधानांच्या पीएमकेअर्स फंडमध्ये आपले योगदान देतील.” या नव्या स्वरुपाच्या परफॉर्मन्ससाठी ते खूश आहेत. याबद्दल ते म्हणाले, " या कार्यक्रमाच्या थेट सादरीकरणामध्ये भारतीय संगीत उद्योगातील दिग्गज आशा भोसले, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रमण्यन, उदित नारायण, कुमार सानू, हरिहरन, के.जे. येसुदास, सोनू निगम, कैलाश खेर, सलीम मर्चंट, शंकर महादेवन, अनुप जलोटा, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, पंकज उदास, शान आणि तलत अजीज या नावांचा यात समावेश आहे ." 

प्रख्यात गायक सोनू निगम यांनी इन्स्टाग्रामवर आपला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, "ह्या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी गाण्याशिवाय काहीच उत्तम नाही. @संगीतसेतू_इन च्या योगदानामध्ये आणि  ईस्राच्या या कौतुकास्पद प्रयत्नात मला माझ्या साथीदारांसह, खांद्याला खांदा लावून यात सामील होण्याचा सन्मान वाटतो. #इंडियाफाइट्सकॉरोना @पीएमओइंडिया"

कैलाश खेर यांनी त्यांच्या ट्विटरवर ट्विट केले, "आम्ही #पीएमकेअर्सफंड चे समर्थन करण्यासाठी एकत्र येत आहोत. तुम्ही सर्वही या १८ कलाकारांमध्ये  सामील व्हा. प्रमुख ओटीटी आणि डी2एच प्लॅटफॉर्मवर सायंकाळी ते वाजता. #ईस्रा आयोजित  #संगीतसेतू १० ते १२ एप्रिल दरम्यान थेट पहा. आमच्याबरोबर सामील व्हा, आमच्याबरोबर गा. #इंडियाफाइट्सकॉरोना @पीएमओइंडिया @नरेंद्रमोदी"

शंकर-एहसान-लॉय संगीतकार त्रिकूटातील  गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी ट्वीट केले की, “#इंडियाफाईटसकोरोना साठी संगीताचा 'सिपाही' म्हणून उभे राहणे फारच विस्मयकारक बाब आहे. इतिहासाने आपल्याला उदाहरण दिले आहे कि अत्यंत निराशेच्या वेळेस संगीत आत्म्यांस कसे शांती देते. @संगीतसेतू_इन आयोजन हा खरच @ईस्राकॉपीराईट कौतुकास्पद प्रयत्न आहे."

अष्टपैलू पार्श्वगायक शान यांनी ट्विट केले की, “अगदी गडद काळातही संगीत सर्व बाधा ओलांडते. @ईस्राकॉपीराइट चा आभारी आहे कि त्यांनी मला यामध्ये सामील केले ज्यामुळे मला हि माझे लहानसे योगदान देता येईल जे नक्कीच या मोहिमेत महत्वाचे असेल.  #इंडियाफाइट्सकोरोना #संगीतसेतू  #पीएमकेअर्सफंड" 

प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान जोडीतील सलीम मर्चंट यांनी ट्विट केले की, “संगीत सार्वत्रिक आहे आणि त्याला काही सीमा नाही. माझ्या देशासाठी #इंडियाफाईटकोरोना म्हणून एक सैनिक म्हणून उभे राहणे खरोखरच एक दुर्मिळ सन्मान आहे. @ईस्राकॉपीराईट चा  #संगीतसेतू  आयोजित केल्याबद्दल मनापासून आभार मानतो.  #पीएमकेअर्सफंड  @संगीतसेतू_इन"

लोकप्रिय गझल गायक तलत अजीज यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “माझ्या सह-कलाकारांसह #इंडियाफाइटसकोरोना यासाठी एकत्र येण्याचा हा माझ्यासाठी भावनात्मक क्षण आहे. मला, संगीताचा एक नम्र विद्यार्थी म्हणून @ईस्राकॉपीराईट द्वारा आयोजित @संगीतसेतू_इन चा भाग असण्याचा आनंद वाटतो.  #संगीतसेतू #पीएमकेअर्सफंड"

ज्येष्ठ पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांनी ट्वीट केले की, “संगीत देव आहे, देव संगीत आहे. #इंडियाफाइटसकोरोना (#IndiaFightsCorona) चा भाग होण्यापेक्षा जास्त आनंददायक काहीही नाही. आम्ही एकत्रित उभे आहोत आणि @संगीतसेतू_इन #संगीतसेतु आयोजित करण्यासाठी @ईस्राकोपीराईट च्या प्रयत्नांचे आभारी आहोत. #पीएमकेअर्सफंड"

ईस्राच्या वतीने सीईओ संजय टंडन म्हणाले, “देशातील नामांकित गायक लोकांचे मनोरंजन करतील आणि त्यांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतील. या राष्ट्रीय सेवेसाठी मी त्या सर्व कलाकारांचे आभार मानतो. या प्रयत्नात आमच्याशी भागीदारी केल्याबद्दल 'एमपीसी' आणि 'एक्सपी अँड डी बी लाईव्ह' चे देखील आभार मानतो. ”

संगीत सेतू १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी दररोज रात्री ते वाजता ओटीटी प्लॅटफॉर्मवर जिओटीव्ही, एमएक्स प्लेयर, व्होडाफोन प्ले, आयडिया टीव्ही, हॉटस्टार अँड टाटा स्काई. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म हंगामा, पेटीएम, फ्लिपकार्ट, हॅलो आणि डेली हंट यांवर उपलब्ध असेल.  डायरेक्ट टू होम (डी एच) सह डिश टीव्ही आणि टाटा स्कायवर देखील प्रसारित होईल. कोविड -१९ विरुद्ध पीएमकेअर्स  फंडला पाठिंबा देण्यासाठी दूरदर्शनही 'संगीत सेतू' कार्यक्रमाला प्रसारित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला, “उत्कृष्ट कल्पना! यासाठी एकत्र आलेल्या सर्व कलाकारांचे कौतुक. या सर्वांना ऐकण्याची ही एक खास मेजवानी असेल. ”

Comments

Popular posts from this blog

Move Over IPL, PPL Is Here!

Sonu Nigam To Hold Online Concert For Every Indian In Support Of PM Modi’s “Iconic” Request For Janta Curfew/Social Distancing; Takes To Social Media

Bringing Back The Humane In Humanity – Mukkti Foundation – A Smita Thackeray Foundation