"मुंबई आर्ट फेअरमुळे कला अभिजात बनत नसून अधिक प्रवेशयोग्य व सुलभ बनते." - विवेक ओबेरॉय विवेक ओबेरॉय, पूजा बेदी, मधुश्री आणि कुणाल कोहलीच्या हस्ते प्रतिष्ठित मुंबई आर्ट फेअरचे उद्घाटन!
नेहरू सेंटर, वरळी येथे ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई आर्ट फेअरचे द्वितीय संस्करण मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले आहे. २०१९च्या या प्रतिष्ठित प्रदर्शनास तब्बल ५३२ तरुण, आगामी आणि जेष्ठ कलाकार, सर्व एकाच छताखाली एकत्रित आले आहेत. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रे, कुंभारकामविषयक आणि मूळ प्रिंट्स यांसह 3,000 हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मुंबई आर्ट फेअरच्या उद्धाटन सोहळ्यास बॉलिवूड कलाकारांनी रंगत आणली. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेक ओबेरॉय तर विशेष अतिथी म्हणून पूजा बेदी, मधुश्री आणि कुणाल कोहली आदी उपस्थित होते. मुंबई आर्ट फेअरचे डिरेक्टर राजेंद्र यांसमवेत गौतम पाटोळे, प्रकाश बाळ जोशी, पृथ्वी सोनी, रुपाली मदन, रीना नाईक, विश्व सहनी, सोनू गुप्ता यांसारखी मातब्बर कलाकार मंडळींनी आपली कला प्रदर्शित केली.
आर्ट फेअर दरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉय अनेक कलाकारांशी संवाद साधताना, त्यांच्या कामांच्या विशिष्ट गोष्टींबद्दल चर्चा करताना दिसले, त्याचप्रमाणे त्यांनी चारकोल मास्टर गौतम पाटोळे यांच्या कलाकृतीही विकत घेतल्या. प्रसंगी विवेक ओबेरॉय म्हणाले की, “मुंबईसारख्या शहरात जिथे तुम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्धच नाही तिथे अशा अनेक कलाकृतींचे प्रदर्शन करणे खरोखर कौतुकास्पद आहे ! कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची आणि कलेपासून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली पाहिजे. मला वाटते की मुंबई आर्ट फेअर टीम ही कलाकारांसाठी चांगला मंच देत असून त्यांना अधिकाधिक सुलभ बनवीत आहेत आणि मला त्यांची ही गोष्ट खूप आवडली. माझ्या लक्षात आले की येथे अनेक तरूण आणि तरूण जोडपी आहेत जी एका बजेटचा विचार करून आले आहेत आणि तरीही सुंदर कलाकृती खरेदी करू इच्छित आहेत. गौतम पाटोळे यांच्या कलाकृतींचा मी विशेष आनंद घेतला. चारकोल कालाकृतींबद्दल बोलायचे झाले तर ते एक उत्कृष्ट कलाकार आहेत. आणि चारकोल पेंटिंग हे एक अत्यंत कठीण काम आहे. पांढरा रंग ही व्याख्या आहे आणि त्याच्या मध्यभागी काळा रंग भरावा लागतो. एकंदरीतचं माझ्यासाठी हा सर्व खूप चांगला अनुभव आहे!"
इतर कलाप्रेमी लोकांना मुंबई आर्ट फेअर या प्रतिष्ठित कला प्रदर्शनाचा १३ ऑक्टोबर पर्यंत सकळी ११:०० वाजल्यापासून संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत आस्वाद घेता येणार आहे.
Comments
Post a Comment