सुरेश वाडकर आणि अॅबी व्ही यांचे सिंगल्स रिलीज
मुंबई- सिंगल्स व्हिडिओसह ‘गुरुकुल’ परतले! पद्मश्री गायक सुरेश वाडकर आणि कॅनेडियन सेंसेशन गायक अॅबी व्ही यांनी 'मान ले' या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. आजीवासन येथे संगीतकार दुर्गेश, निर्मात्या पद्मा वाडकर यांनी केक कापून सिंगल्स रिलीज केले. पद्मश्री गायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या अनोख्या आवाजाने आणि गायन शैलीने लाखो मने जिंकली आहेत. आता सुरेश वाडकर आजीवासनच्या माध्यमातून गुरूच्या भूमिकेत आहेत. अनेक तरुण संगीतकार, गायकांना तयार करण्यासाठी ते मेहनत घेत असतात. तरुणांसाठी ते प्रकाशकिरण आहेत. ‘मान ले’ या व्हीडियोत सुरेश वाडकर यांना आपण गायक आणि गुरू म्हणून पाहू शकणार आहोत. या म्युझिक व्हिडिओमध्ये सुरेश वाडकर कॅनडा स्थित अॅबी व्ही आणि संगीतकार दुर्गेश यांच्यासोबत एक खास म्युझिकल बाँड शेअर करताना दिसत आहेत. निर्मात्या पद्मा वाडकर यांच्यासोबत या गाण्यात या दोघांनी प्राण फुंकले आहेत. हे गाणे दुर्गेश आर. राजभट्ट यांनी संगीतबद्ध केले असून या म्युझिक व्हिडिओच्या निर्मात्या पद्मा वाडकर आहेत. हे गाणे आजीवासन साऊंडने सादर केले आहे. गायक सुरेश वाडकर, अॅबी व्ही, संगीत निर्माते दुर्गेश आणि निर्...